Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Ephesians Chapters

Bible Versions

Books

Ephesians Chapters

1 देवाच्या इच्छेने झालेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याजकडून, इफिसयेथे जे देवाचे लोक आहेत त्यांना व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणान्यांना,
2 देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून कृपा व शांति असो.
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हांला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.
4 ख्रिस्तामध्ये देवाने आम्हांला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरिल प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे.
5 त्याच्या कृपायुक्त हेतूनुसार येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली.
6 त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.
7 त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही स्वंतत्र केले गेलो, त्याच्या कृपेच्या समृद्धीने आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
8 त्याची कृपा आपले ज्ञान आणि समजबुद्धी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.
9 ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.
10 पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती.
11 ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो
12 यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी.
13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हांवर शिक्का मारला
14 जोपर्यंत देव, आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्शाचा विसार आहे. आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुति होईल.
15 यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले,
16 तेव्हापासून तुमच्यासाठी देवाचे उपकार मानण्याचे मी थांबविले नाही.
17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयी ज्ञान तुम्हांला पुरवील, ते देवो.
18 मी असे सांगतो की, तुमच्या अंत:करणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे.
19 आणि आम्हांला विश्वासणान्यांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे, जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्यचा तो सराव आहे.
20 जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
21 देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले.
22 आणि देवाने ख्रिस्ताला मंडळीचा सर्वोच्च प्रमुख केले.
23 मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, ती पूर्णता तो मंडळीला देतो.

Ephesians Chapters

Ephesians Books Chapters Verses Marathi Language Bible Words display

COMING SOON ...

×

Alert

×